सार्वजनिक मंडळे

1. आम्ही जांबूतकर विचारमंच

2. जय हनुमान कला क्रिडा मंडळ

3. चारंगबाबा गणेश मित्र मंडळ

4. दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ

5. कळमजाई नवरात्रोत्सव मंडळ

6. काळुबाई माता नवरात्रोत्सव मंडळ

7. ओम साई मित्र मंडळ

8. जय हनुमान मित्र मंडळ, शरदवाडी

9. बिरोबा मित्र मंडळ, शरदवाडी

10. मळगंगा मित्र मंडळ


आम्ही जांबूतकर विचार मंचाने राबविलेले उपक्रम

अ. नं.

दिनांक

उपक्रम

०१

२२ डिसेंबर २०१२ ते २६ डिसेंबर २०१२

वृक्षारोपण : गावठाणामध्ये आणि पेठेतील रस्ते, शाळा परिसरात १००० वृक्ष लागवड करण्यात आली.

०२

०४ जून २०१३

करिअर मार्गदर्शन शिबीर : १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थांसाठी पुढील शिक्षणाच्या वाटा आणि संधी याविषयी मार्गदर्शन

मार्गदर्शक : प्रा. संतोष कारले आणि प्रा. विजयकुमार जोरी सर

०३

११ ऑगस्ट २०१३

वृक्षारोपण

०४

०६ सप्टेंबर २०१३

गुरुजन कृतज्ञता सोहळा : शिक्षक दिन साजरा करतांना सर्व गावामध्ये सुरुवातीपासून सेवा देणाऱ्या शिक्षकांचा सत्कार आणि कृतज्ञता सोहळा

०५

०६ सप्टेंबर २०१३

जय मल्हार हायस्कूलच्या संरक्षक भिंतीसाठी १००००/- रुपये रोख देण्यात आले.

०६

०१ जुलै २०१३ ते १५ जुलै २०१३

परवाना वाटप :

०६ सप्टेंबर २०१३

पाणी परवाना शिबीर : कुकडी नदीवरून शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी लागणारा पाणी परवाना ५४ शेतकऱ्यांना घरपोच देण्यात आला.

०७

२६ ऑक्टोबर २०१३

शाळेसाठी ई-लर्निंग प्रोग्राम संच : मा. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप साहेब यांच्याकडून वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त शाळांसाठी प्रदान.

०८

०४ नोव्हेंबर २०१३

दिवाळी पहाट : आम्ही जांबूतकर विचारमंचाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्यासाठी दिवाळी पहाट संगीत व भावगीतांचा कार्यक्रम

०९

१६ एप्रिल २०१३

सर्वरोगनिदान शिबीर : यामध्ये १३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि गरजू २९ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. या शिबिरात रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आली.

१०

२९ जानेवारी २०१४

शालेय विध्यार्थ्यांना जंतनाशक औषध वाटप करण्यात आली.

११

१५ जून २०१५

शालेय विध्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप : गावातील ४ गरीब व अनाथ विध्यार्थांची सर्व शिक्षणाची जबाबदारी उचलून त्यांना वर्षभरासाठी लागणारे शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, दप्तर, शाळेचा गणवेश इ. साहित्य देण्यात आले.

१२

१५ जून २०१५

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जय मल्हार हायस्कूल जांबूतच्या सर्व विध्यार्थ्यांसाठी दररोज वाचनासाठी इंग्रजी सकाळ टाइम्स वृत्तपत्र सुरु करण्यात आले.

१३

०८ ऑक्टोबर २०१५

प्रथम सत्रामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबूतच्या सर्व विध्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटण्यात आल्या.

१४

१५ ऑगस्ट २०१५

गावातील सर्व पाच अंगणवाड्यांना शालेय आहार शिजविण्यासाठी पाच स्वतंत्र गॅसकनेक्शन आले.

१५

३१ जुलै २०१५

गुरुपोर्णिमा उत्सव : गुरुपोर्णिमानिमित्त शालेय विध्यार्थांसाठी गुरवर्य जीवन देशमुख यांचे व्याख्यान व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

१६

०४ ऑक्टोबर २०१५

वृक्षारोपण


सर्वरोग निदान शिबीर


कुकडी नदीवरून पाणी उपसा परवाना वाटप


जय मल्हार विद्यालयास आम्ही जांबूतकर तर्फे संरक्षक भिंतीसाठी आर्थिक मदत देताना