शिक्षण

स्वातंत्र्य काळामध्ये शिक्षणाचे वारे देशभर वाहू लागले. त्याबरोबर गावातही त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. १९२८ साली जिल्हा परिषदेच्या शाळेची गावात सुरुवात झाली. तसेच प्राथमिक शिक्षण इ. ७ वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु होते. गावातील मुलामुलींना पुढील माध्यमिक शिक्षणासाठी पारगाव, आळकुटी यासारख्या ठिकाणी जावे लागत होते, त्यामुळे त्यावेळच्या गावकारभारी मंडळीनी एकत्र येऊन लोकवर्गणी, श्रमदान करून माध्यमिक विद्यालयाची सुरुवात १९८४ साली गावात केली. व जय मल्हार हायस्कूल इ १० वी पर्यंत चांगल्या शैक्षणिक गुणवत्तेची लौकीकासह डी. सी. एम. सोसायटी पुणे या संस्थे मार्फत चालू आहे.

तसेच सर्व शिक्षा अभियान या शासनाच्या योजने अंतर्गत गावामध्ये जिल्हा परिषदेच्या १ केंद्रशाळा व ३ वस्ती शाळा ( द्शिक्षकी ) व १ माध्यमिक विद्यालय आहे, व एक इंग्रजी माध्यमाची ४ थी पर्यंत शाळा आहे. यामध्ये एकुण १२३३ विध्यर्थी शिक्षण घेत आहेत.

गावामध्ये आदर्श ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा व गावातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन सोय म्हणून जुने २०१६ पासून आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयसुरु केले असून विज्ञान व वाणिज्य शाखेचे वर्ग सुरु केले आहेत

विध्यार्थी संख्या

शिक्षकेतर

शाळा

मुले

मुली

एकुण

शिक्षकसंख्या

कर्मचारी

मुख्याधापक

जि. प. प्राथमिक शाळा जांबूत

११४

८५

१९९

०७

००

पी.सी. बारहाते

जि. प. प्राथमिक शाळा सरदवाडी

२९

२०

४९

०२

००

नवनाथ एन. निचित

जि. प. प्राथमिक शाळा गाजरेझाप

३५

३७

७२

०२

००

ए. एन. गांजे

जि. प. प्राथमिक शाळा जोरीलंवन

१३

११

२४

०२

००

मेघा एस. रणसिंग

जय मल्हार हायस्कूल, जांबूत

४०५

३०७

७१२

२०

०६

आर. एस . कापसे

आदर्श इंग्लिश स्कूल

१०२

६२

१६४

०८

०२

श्री संतोष येवले सर

आदर्श ज्युनिअरकॉलेज

५४

४४

९८

०८

०२

श्री संतोष येवले सर


गावामधील जिल्हा परिषद प्राथ. शाळा गाजरेझाप ही शाळा ISO – 9001:2008 मानाकन प्राप्त आहे.

सर्व शाळांमध्ये दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर e-learning program द्वारे शिक्षण दिले जाते. तसेच विविध वकृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.

जय मल्हार हायस्कूलची इयत्ता दहावीच्या परीक्षेचा १०० % निकालाची परंपरा आहे. शाळामधील सर्व विध्यार्थांचे स्वतःचे ‘आरोग्य पत्रक’ असून त्यांची दोन्ही सत्रात तपासणी केली जाते. गावातील शाळेमधून शिकलेले विध्यार्थी प्रशासकीय अधिकारी, अभियंते, डॉक्टर्स, शेती व्यवसा, उद्योग धंदे व सैन्यदल क्षेत्रात कार्यरत आहेत.

राष्ट्रीय एकात्मिक विकास कार्यक्रम अंतर्गत गावामध्ये ५ अंगणवाडी आहेत. त्या सर्व अंगणवाडयासाठी स्वतंत्र खोल्या आहे. यामध्ये बालकांची नित्य तपासणी, कुपोषण निर्मुलन यासारख्या गोष्टींवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष असते. व कुपोषण निर्मूलनाचे उदिस्ट सफल झाले आहे.


अ. नं.

अंगणवाडीचे नाव

विद्यार्थी मुले

विद्यार्थी मुली

एकुण

०१

गावठाण

२०

१४

३४

०२

शिस्तारवस्ती

०६

१६

२२

०३

शरदवाडी

१३

१४

२७

०४

दुडेमळा

०६

०६

१२

०५

गाजरेझाप

१२

१६

२८

* गावामध्ये सध्या एकही मुल ‘शाळाबाह्य’ नाही.