आरोग्य विषयक

आरोग्यसेवेसाठी प्राथमिक उपकेंद्रे टाकळी अंतर्गत गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे असून त्यामध्ये गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतिगृह इ. सुविधांनी सुसज्ज आहे.

त्याप्रमाणे ७ खाजगी दवाखाने असून त्यामध्ये आरोग्य सेवा पुरविली जाते.

या सर्व दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर गरजू रुग्णांसाठी –

०१) प्राथमिक आरोग्य केंद्रे टाकळी हाजी

०२) तालुका आरोग्य केंद्र ( शिरूर ग्रामीण रुग्णालय)

०३) मंचर उपजिल्हा रुग्णालय

०४) ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे

०५) यशवंत चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटल पिंपरी चिंचवड

येथे उपचारासाठी सुविधा पुरविल्या जातात.


अ. नं.

दवाखाना

वैद्यकीय अधिकारी

अहर्ता

संपर्क

०१

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

डॉ. छाया गायकवाड

MBBS

९६६५६२४३०८

श्रीमती. फापाळे सिस्टर

९८९०२०७५६६

०२

संजीवन हॉस्पिटल

डॉ. एन. जे. जगदाळे

DHMS

९९६०४२१३३९

०३

आशिर्वाद हॉस्पिटल

डॉ. शिवाजी जगताप

BAMS

९८२२४१८२८८

डॉ. जयश्री जगताप

BAMS

९९२१४७३१६७

०४

धन्वंतरी हॉस्पिटल

डॉ. बी. बी. मावळे

BAMS

९७६३३६३७७६

डॉ. पद्मा मावळे

BHMS

-

०५

सोनहिरा हॉस्पिटल

डॉ. संतोष पोटे

BHMS

९९२३२४५६९६

डॉ. स्वाती पोटे

BHMS

-

०६

समर्थ हॉस्पिटल

डॉ. दत्ता डुकरे

BHMS

९७३०६५१११२

०७

ओम हॉस्पिटल

डॉ. के. आर. फलके

BHMS

९८५०९४५६२५

०८

सुषुशा क्लिनिक

डॉ. एम. के. थोरात

BEMS

९७३०२११६९०


आरोग्य विषयक उपक्रम –

गावामध्ये सर्व रोगदान शिबिरांचे आयोजन करताना सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य यंत्रणा मोठ्या हिरहिरीने भाग घेतात. यामध्ये दर ०६ महिन्यांनी गेल्या ३ वर्षापासून सर्व रोगनिदान शिबीर व स्पेशालीस्ट कॅम्पस घेतले जातात. आरोग्य विभागातर्फे सर्व शालेय विद्यार्थांची नियमित आरोग्य तपासणी, जंतनाशक औषधे, आरोग्यपत्रक वाटप केले जाते.

स्तनदा, गर्भवती महिलांसाठी मार्गदर्शन, औषधे, सल्ला देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. छाया गायकवाड तत्प्तर असतात. १००% प्रसूती आरोग्य केंद्रात करण्यात आरोग्य विभागाला यश आलेले आहे. दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाचा सन्मान करण्यात येतो

गावामध्ये कुपोषण निर्मुलानामध्ये (१००%) उद्दिष्ट गाढण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. लहान मुले, नवजात बालके यांचे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम नुसार १००% लसीकरण करण्यात यश आले आहे. पल्स पोलिओ कार्यक्रम, १००% यशस्वी करण्यात येतो.


प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हाजी अंतर्गत उपकेंद्र जांबुत