" सांसद आदर्श ग्राम योजना "


मा. श्री. नरेन्द्र मोदी (पंतप्रधान, भारत)

स्वातंत्र दिनोत्सव प्रसंगी बोलताना मी माझ्या सांसद सहकाऱ्यांच्या वतीने आपणास एक वचन दिले होते. मी माझ्या स्वप्नसृष्टीतील एका अशा आदर्श ग्रामाची रूपरेखा मांडली होती, जे आरोग्य, स्वच्छता, हिरवेगारपण आणि सामुदायिक सौदर्याचे केंद्र असेल. सदर दिशा-निर्देश त्याच सिध्दातावर आधारित आहे आणि प्रत्येक संसद सदस्यासाठी आदर्श ग्राम योजनेचा आराखडा प्रस्तुत करताहेत. ज्यांचे अनुसरूण करून ते आपआपल्या मतदारसंघात वर्ष २०१६ पर्यंत एक-एक आणि २०१९ पर्यंत दोन-दोन आदर्श ग्राम विकसित करू शकतील.

अधिक वाचा

मा. श्री. नितीन गडकरी ( भारतीय महामार्ग रस्ते व वाहतूक मंत्री )

११ ऑक्टोबर स्व. लोकनायक श्री. जयप्रकाश नारायणजींच्या वाढदिवसाच्या प्रसंगी आम्ही गांधीजींचे अनुकरण करीत ग्रामस्वराजाची संकल्पना सांसद आदर्श ग्राम योजनेद्वारे साकार करू इच्छितो. श्री. अटल बिहारी वाजपेयींच्या दूरदर्शी नेतृत्वात राष्ट्रीय जनतांत्रिक युतीने सडकांची निर्मिती आणि शहरी स्तराच्या सुखसोईच्या माध्यमाने भारतातील खेडोपाडी आर्थिक संधी उपलब्ध करण्याचा संकल्प केला होता. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ह्या संकल्पेतून ग्रामीण भागात सडकांच्यामुळे दळण-वळणाची चांगली सोय उपलब्ध करून देणाऱ्या कामात माझा जवळून सहभाग होता.

अधिक वाचा

मा. श्री. संजय काकडे (राज्यसभा सदस्य)

स्वातंत्र्यदिनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सांसद आदर्श ग्राम योजना’ ही ग्रामीण भारताची स्वप्ने सत्यसृष्टीत उतरविण्याच्या दृष्टीने सुरु करण्याचे घोषित केले. त्याक्षणी मला खूप आनंद झाला. व या योजनेत महात्मा गांधीच्या ग्रामीण भारताविषयीचे विचार प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने मी आपल्या ‘जांबूत’ गावाची निवड केली. या योजनेत सर्वांनी सहभाग घेऊन आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात उतरवू. व्यक्तिगत विकासापासून, पायाभूत विकास, भौतिक सुविधा, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण यासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून तसेच CSR निधीतूनही सर्व स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यास मी कटीबद्ध असेल. यासाठी आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपले गाव संपूर्ण देशामध्ये आदर्श बनविण्याचे काम करूया व आपले गाव इतरांसाठी आदर्श राहील अशी आशा व्यक्त करतो. ग्रामीण पातळीवरील सर्वसमावेशक योजनांनी, आपले गाव आदर्श करण्यासाठी आपण सहभाग द्यावा म्हणजे ही योजना सफल होईल.

Welcome to Saanjhi

The vision of our Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi is "If we have to build the nation we have to start from the villages" and he believes that "If every MP transforms villages in his/her constituency into model villages, large number of villages in the country would have seen holistic development". Our PM has requested all Members of Parliament (MP) to develop one model village in their constituency by year 2016 and two more by 2019. Department of Rural Development has formulated guidelines of the scheme. Hon'ble Prime Minister has released the guidelines on 11'th Oct 2014 at Vigyan Bhawan, New Delhi.

अधिक वाचा

गॅलरी

शासन आपल्या दारी कार्यक्रम

अधिक पहा

वृक्षारोपण कार्यक्रम

अधिक पहा

आरोग्य शिबिर तपासणी कार्यक्रम

अधिक पहा