ग्रामगीत

गाव आमुचा असे महान

नाव तयाचे जांबूत ग्राम

त्याच्या महानतेचे आम्ही

नित गाऊ गुणगौरव गान ।। आदर्श ग्राम ...३

धन्य किनारा कुकडी नदीचा

असे पहारा विश्वेश्वराचा

गदा सावरुन उभे हनुमान

गाव आमुचा असे महान ।।१ आदर्श ग्राम ..३

खंडेराय कुलदैवत आमुचे

कळमजाई ग्रामदैवत अमुचे

अराध्य दैवत पंढरीधाम

गाव आमुचा असे महान ।।२ आदर्श ग्राम ...३

शेती वाडी घर शिवार अन्

पिक पाण्याला नाही पार

दुध दुभते गोमाता वाण

गाव आमुचा असे महान ।।३ आदर्श ग्राम ...३

सिंचन इथले ठिबक ठिबक अन्

पाझर तलाव वर्षाजल संचयन

वन संवर्धन आमुचे काम

गाव आमुचा असे महान ।।४ आदर्श ग्राम ...३

शिक्षणी रमती बाळ गोपाळ

यौवन आमुचे मस्त आभाळ

गृहस्थी जीवन हे सुफलाम

गाव आमुचा असे महान ।।५ आदर्श ग्राम ...३

इथे निपजले कर्म पुढारी

कवी कलाकार गुरु धन्वंतरी

सुपुत्र गाती राष्ट्रसेवा गान

गाव आमुचा असे महान ।।६ आदर्श ग्राम ...३

दिंड्या पताका इथली शान

हरिनाम सप्ताही नुरते भान

वैष्णव गाती नित गीता गान

गाव आमुचा असे महान ।।७ आदर्श ग्राम ...३

जत्रा आखाडे अन् बैलगाडे

नाट्य तमाशा शाहिरी पवाडे

सणा सुदिच्या रीती महान

गाव आमुचा असे महान ।।८ आदर्श ग्राम ...३

प्रणाम आमुचा या मातीला

न्याय समता अन् बंधुत्त्वाला

वचन असे हे थोर महान

गाव आमुचा असे महान ।।९ आदर्श ग्राम ..३


ग्रामगीत ऐकण्यासाठीग्रामगीत डाऊनलोड करण्यासाठी