जांबूत गाव

पुणे शहरापासून सुमारे ७५ कि.मी. व अहमदनगर शहरापासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आहे. शिरूर, पारनेर, नारायणगाव, मंचर, आळेफाटा ही शहरे जांबूतपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. शिरूर तालुकाच्या बेट भागातील, पश्चिमेकडील टोकाचे गाव असून पारनेर, जुन्नर, आंबेगाव तालुकाच्या सीमीरेषेजवळ आहे.

गावातील वैशिष्ट्य :

गावामध्ये सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावाला पुरातन काळापासून एक धार्मिक परंपरा लाभलेली आहे. गावात सर्व धर्मियांचे सण, उत्सव, हरीनाम सप्ताह मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. गावाला कुकडी प्रकल्पातर्गत कुकडी नदीवरील कोल्हापुर पद्धतीचे बंधारे व मीना शाखा कालवा अंतर्गत सिंचन व्यवस्था असल्याने तसेच जमीन काळी कसदार, सुपीक काही भागात मुरमाड आहे. त्यामुळे बारमाही ऊस, डाळिंब, केळी, द्राक्षे यासारख्या बागायती पिके व कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो यासारखी पिके घेतली जातात. शेती हा मुख्य व्यवसाय असून जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतात.

जांबूत गावामध्ये जांबूत व शरदवाडी अशी दोन महसुली गावे असून गावात एकुण ९२१ कुटुंबे आहेत.

स्वातंत्र्यकाळात शिक्षणाचे वारे देशभर वाहू लागले. गावातही त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या व १९२८ साली ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळा सुरु केली व त्यामध्ये काळाप्रमाणे बदलत, सुधारणा करत सुंदर इमारतीमध्ये गावात पूर्व प्राथमिक ते १० वी पर्यन्त मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांची शाळा आहे.

या शाळामधून शिक्षण घेतल्या नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शेती, उद्योग, शिक्षण क्षेत्रात तसेच प्रशासकीय अधिकारी, अभियंते, डॉक्टर देशसेवेसाठी सैन्यदलात सेवा करत आहेत.


प्राथमिक सर्वेक्षणाची ठळक वैशिष्टे (Baseline Survey)

जांबूत

शरदवाडी

एकुण

कुटुंब संख्या ( सन २०११ )

७६१

१६०

९२१

लोकसंख्या

३९४०

७९७

४७३७

पुरुष

१३५४

२८७

१६४३

स्त्रीया

१३४६

२७२

१६१८

६ वर्षाखालील

३६१

६९

४३०

६ ते १८ वर्षे

७६९

१५८

९२७

१८ वर्षावरील

२७५५

५६४

३३१९

SC (कुटुंबे)

४९

०१

५०

ST (कुटुंबे)

२१

०३

२४

OBC (कुटुंबे)

१९४

१२४

३१८

Other

४९७

३२

५२९

APL

५६८

१४६

७१४

(BPL)

१९३

१४

२०७

अपंग पुरुष

२५

०३

२८

अपंग स्त्रीया

१३

०४

१७

अशिक्षित (निरक्षर)

२१

१८

३९

जमीन क्षेत्रफळ एकुण

१८९२.९१ हेक्टर

६८४.१७ हेक्टर

२५७७.०८ हेक्टर

वापरातील जमीन

९०५.२७ हेक्टर

३४६.४६ हेक्टर

१२५१.७३ हेक्टर

पड जमीन

१६५.१ हेक्टर

२१.२५ हेक्टर

१८६.३५ हेक्टर

बागायत

८२२.५४ हेक्टर

३१६.४६ हेक्टर

११३९.३५

वीज कनेक्शन असलेली कुटुंबे

३३३

२९

३६२

वीज कनेक्शन नसलेली कुटुंबे

८५

२३

१०८